ठाकरे सरकारला विकासाचा कावीळ झाला, शेलारांची टीका

Ashish Shelar & Uddhav Thackeray.jpg

मुंबई : राज्यातील विविध निर्णयांवर आणि कामांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना महाराष्ट्र द्रोह का करत आहे ? असा सवाल करत ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला विकासकामाचं काविळ झालं आहे असा घणाघात आशिष शेलार (Ashish Shelar) केला.

यावेळी बोलताना आशिष शेलारांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं. मेट्रोच्या बाबतीत सरकार गंभीर नाही. ज्या अर्थी बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड तयार करण्याचा प्लॅन आहे तिथेच ठाकरे सरकार मेट्रोबाबतीत गंभीर नसल्याचं समोर येतं. यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या निक्रियतेमुळे मुंबईत आर्थिक केंद्र झालं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर गेले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजना नुसार बीकेसील भूखंडावर भूभागात बुलेट ट्रेनचे स्टेशन तर पृष्ठभागावर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र येणार आहे. आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर घालवणार ? का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय? ठाकरे सरकारला विकासाचा कावीळ झाला, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

इतंकच नाही तर लडकवण भटकवण झडकवण अशी ठाकरे सराकरची शैली आहे असं म्हणत शेलारांनी ठाकरे सरकारला थेट सावल केले. लेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय…? ठाकरे सरकारचा हा तीन तिघाडा…मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक मिळणार “वातानुकूलित बैलगाडा, अशीही टीका आशिष शेलारांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER