‘ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे संपूर्ण बोगस कारभार’, निलेश राणेंची टीका

CM Uddhav Thackeray - Nilesh Rane

सिंधुदुर्ग : राज्यासह देशात कोरोनाने (Corona) चिंता वाढवली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह (Lockdown) कडक निर्बंध लावले जात असतानाच पंढरपूरमध्ये मात्र पोटनिवडणुकीच्या प्रचार सभांचा धुरळा उडाला आहे. एका बाजूला राज्य मोठ्या संकटाशी दोन हात करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला संबोधताना सांगितलं आहे.

मात्र, महाविकास आघाडीमधील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना कोरोनाचा पुरता विसर पडल्याचं आता समोर आलं आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनली असून प्रचार सभांनादेखील वेग आला आहे. एकीकडे राज्यात कोरोना वाढत असल्याने निर्बंध लावण्यात येत असताना राजकीय पक्षांना मात्र याचं भान नसल्याचं समोर येत आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेला सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे अशा कोरोना प्रतिबंधक नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. जयंत पाटलांच्या या दौऱ्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता.

इतकेच नाही तर ज्या प्रचार सभेत त्यांनी भाषण ठोकलं, त्या सभेत शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी विखारी टीका केली आहे. ‘जे मंत्री नियम मोडतात तेच मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊनचे निर्णय घेणार??? हे कितपत योग्य आहे?? ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे पूर्ण बोगस कारभार. मुख्यमंत्र्याना त्यांच्याच पक्षातली लोकं व त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री गांभीर्याने घेत नाही हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असेल.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button