परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचे संकेत

Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना एक पत्र लिहून मोठा भूकंप केला. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ठाकरे सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. परमबीर सिंह यांचे हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि शिवसेनेचे संकटमोचक असलेल्या संजय राऊत यांनी सूचक संदेश ट्विट केला आहे.

संजय राऊत यांनी रविवारी आपल्या जावेद अख्तर यांची एक शायरी ट्विट केला. ”शुभ प्रभात, हमको तो बस तलाश नए रास्तों की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए हैं.” असे सूचक ट्विट राऊत यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांना या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER