मराठा आरक्षणासाठी ‘ठाकरे’ सरकारचे प्रयत्न, नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना?

Maharashtra Today

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने(SC) मराठा आरक्षण(Maratha Reservation) रद्द केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ‘ठाकरे’ सरकारने (Thackeray Govt)हालचाली सुरू केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून नवा मागासवर्गीय आयोग स्थापण्याची शक्यता आहे. यासाठी मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षण उपसमितीची बैठक होणार असून त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजातून तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. विरोधकांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची कोंडी केली होती. या पार्श्वभूमीवर नव्याने मागासवर्घीय आयोग स्थापन करण्याचा सल्ला प्रशासनाला देण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे. त्यात नव्या मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांचे मागासलेपण सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ मिळणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोग अवैध ठरवला होता. हा आयोग एकतर्फी असल्याचं न्यायालयाने नमूद केले होते. त्यावर सरकारच्या वकिलांना योग्य युक्तिवाद करता आला नव्हता. त्यामुळेच सरकारने नव्याने मागासवर्गीय आयोग स्थापण करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. नव्याने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि तो अहवाल राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button