ठाकरेंची प्रचार सभा…उमेदवार आणि पक्ष प्रवेश!

लोहा : राजकारणात कधी काय होईल. सांगता येत नाही …वार्‍याची ’दिशा’ नेमकी कशी …याचा काहीच नेम नसतो. …कोण कधी’ शिवधनुष्य’ उचलेल याची ’गॅरंटी ती काय …! पित्यांचा ’सामना’ आणि पुत्राची’ प्रचार ’सभा भाई धोंडगे यांच्याच भोवती फिरली. हा योगायोग लोहा-कंधार वासीयांनी अनुभवला तो श्री संत गाडगे महाराज विद्यालयाच्या मैदानावर कालखंड ठरला तो 25 वर्षाचा.

ही बातमी पण वाचा : मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे- उद्धव ठाकरे

1990च्या दशकात शिवसेनेची वारे तुफान होते ..सत्तांतर घडवून आणण्याची प्रेरणा त्याकाळी शिवसैनिकांत होती…शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लोकांचा ’प्राण ’होता. तो काळ शिवसेनेच्या विचाराने मंतरलेला होता….या भागात कंधार विधानसभेत शेकाप चे नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निर्विवाद वर्चस्व होते…त्या गडाला हादरा 1990 मध्ये बसण्यास सुरुवात झाली.

ते तत्कालीन जिल्हाप्रमुख रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ..
1995 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लोह्यात श्री संत गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणावर विक्रमी सभा झाली. बाळासाहेबांच्या भाषणाने भरगच्च भरलेले मैदान ’शहारून ’गेले होते ..निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला ..माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचा विजय ऐतिहासिक ठरला त्यामुळे. शेकाप च्या वर्चस्वाला गतिरोध बसला.

25 वर्षाच्या राजकीय घडामोडीत खूप उलथापालथ झाली.जिल्ह्याकडे मुख्यमंत्रीपद आले. राजकारणात फेरबदल होत गेले. भाई धोंडगे यांचे चिरंजीव भाजपात व त्यानंतर शिवसेनेत स्थिरावले.. मागील निवडणुकीत चिखलीकर निवडून आले ते भाजपात गेले. खासदार झाले. या घडामोडीत आता मतदार संघात विजयाचा ’शिवधनुष्य ’मुक्तेश्वर धोंडगे हे उचलणार असे चित्र तयार झाले आहे.

1995 नंतर तब्बल 25 वर्षाच्या कालखंडात याच शाळेच्या मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली ती भाई धोंडगे यांचे चिरंजीव मुक्तेश्वर यांच्या विजयासाठी, आणि त्या सभेत माजी आ. रोहिदास चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला.

राजकारणाचा योगायोग असा की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे (1995) माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या विजयासाठी याच मैदानावर आले आता त्याच मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाई धोंडगे यांच्या चिरंजीवांच्या विजयासाठी प्रचार सभेला आले.पित्यांच्या ’सामना’ होता भाई धोंडगे यांच्याशी ..आणि पुत्र (उध्दव ठाकरे) यांचे प्रचार सभा धोंडगेच्या चिरंजीवा साठी हा एक राजकीय दुर्मिळ योग! ठाकरे यांची प्रचार सभा..आणि प्रवेश यानिमित्ताने मतदारसंघाने अनुभवला.