…अन्यथा मोठे संकट येईल, ‘ठाकरे’ सरकारला करवून दिली राज ठाकरेंच्या मागणीची आठवण

Raj Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई : सध्या राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची आणि त्यांच्या मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे आवश्यक झाले आहे. तर दुसरीकडून इतर राज्यातून कामगारांचे लोंढे मुंबईत परतताना दिसून येत आहे. या परप्रांतीय कामगारांची रेल्वे स्थानकातच कोरोना चाचणी करावी. पॉझिटिव्ह आलेल्यांना थेट रेल्वेस्थानकावरुनच विलीगीकरणात पाठवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांह्याकडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहे. आणि यावरुन मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला राज ठाकरेंच्या मागणीची आठवण करवून दिली आहे. आपल्या राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात वाढले की बाहेर राज्यातील लोक आपल्या राज्यात परत जातात व त्यांच्या राज्यात वाढ झाली की मुंबईत परत येतात. परत येताना त्यांची केवळ नोंद न होता बारकाईने सर्व गोष्टी तपासल्या पाहिजे अन्यथा हेच लोक संसर्ग पसरवू शकतात, मोठे संकट उभे करु शकतात याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी राज्य सरकारला सुचविले आहे. सरकारने या मागणीची तात्काळ दखल घेत याबतचे कडक निर्देश प्रशासनाला दिले पाहिजे, अशी सूचना नांदगावकर यांनी केली आहे.

तसेच जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ उघडी ठेवल्याने या ४ तासात अशा सर्व दुकानाबाहेर गर्दी होताना दिसून येत आहे. उलटपक्षी ही दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत चालू ठेवल्यास लोकांची विनाकारण होणारी गर्दी टाळता येईल. त्यामुळे सरकारने वस्तुस्थिती जाणून घेऊन दुकानांची वेळ तात्काळ वाढवावी, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button