‘ठाकरे-मोदी’ एकाच माळेचे मणी; मनसेचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल

Bala Nadngaokar - Maharashtra Today

मुंबई :- पाच राज्यांच्या निवडणुकांवेळी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र या राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता पुन्हा एकदा इंधनाचे दर दररोज वाढताना दिसून येत आहेत. अनेक शहरांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे तर जवळपास सर्वच ठिकाणी शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दररोज होत असलेल्या दरवाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

नांदगावकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लक्ष्य केले आहे. ‘मागील १५ महिने सातत्याने दरवाढीचा सामना सामान्य जनता करीत आहे. यात केंद्र व राज्य दोघांनी एक पाऊल पुढे येऊन कर त्वरित घटविले पाहिजे. जीएसटी विक्रमी १४१००० कोटींवर पोचला असताना, केंद्राने वेळोवेळी लादलेले कर मागे घ्यावे. त्यामुळे राज्य सरकारने केवळ केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा बाकीच्या राज्यातील इंधन दरांवर नजर मारून आपल्या राज्यात दर कमी करणे हितावह ठरेल. असे न केल्यास जनतेचा आता ठाम विश्वास होईल की दोघेही “एकाच माळेचे मणी” आहेत.’ असे म्हणत नांदगावकर यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button