हातमजूर, कामगार, घरकाम करणा-या महिलांना ठाकरे सरकारने आर्थिक सहाय्य करावे – भाजपा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य, देश लॉकडाऊन असल्याने समाजातील वंचित घटक आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सहकार्याची गरज आहे. याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लक्ष वेधण्यासाठी भाजप कार्यकर्त्याने त्यांना एक पत्र लिहीले आहे.

राज्यातील हातावर पोट भरणारे हातमजूर, घरकाम करणा-या महिला, नाका बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक तसेच अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांना शासकीय आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा असे कल्याण पुर्वचे भाजपा कार्यकर्ते गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

कोरोना पासून राज्याला वाचविण्यासाठी राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहेत. परंतू लॉकडाऊनचा मोठा परिणाम हातावर पोट असणा-या लोकांवर झाला आहे. हातमजुरांचा दैनंदिन रोजगार गमावल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे सरकारने या गरीब कुटुंबांसाठी आर्थिक सहाय्य करावे अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

राज्यातील लॉकडाऊन कधी संपेल याविषयी कल्पना नसल्याने या मजुरांनी अन्न धान्य पुढे मिलेल की नाही या भीतीने आपल्याकडे असलेल्या ससर्व बचत रक्कम जीवनावश्यक वस्तू घरात भरून ठेवणम्याकरिता खर्च केलेले असल्याने त्यांच्याकडे आता रोख रक्कम शिल्लक नाही.

केंद्र सरकारने या मजुरांना दिलासा दिला आहे कर्जाच्या हप्त्याची मुदत तीन महिने पुढे ढकलल्याने यांना दिलासा मिळाला तसेच पिवळे रेशनकार्ड धारकांना तीन महिने मोफत तांदूळ देणार आहे. परंतु तीन महिन्यानंतरच्या हप्त्याची चिंता या नागरिकांना असणार आहे. वैद्यकीय खर्च, रोजचा दैनंदिन खर्च आणि त्यांच्याकडे आता पैसे नसल्याने त्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्कता असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे तातडीने या मजुरांना ठाकरे सरकारने आर्तिक सहाय्य करावे अशी विनंती पत्रातून गायकवाड यांनी केली आहे.