राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली उत्तराखंडला निघालेले राज्यपाल विमानातून उतरून माघारी

मुंबई :- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना थेट विमान प्रवासाची परवानगी नाकारल्याची माहिती मिळत आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरून परत राजभवनावर यावे लागले. खरं तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विमानाने उत्तरखंडमध्ये झालेली हानी  पाहण्यासाठी म्हणून निघाले होते. मात्र, विमानात बसल्यानंतर त्यांना विमान प्रवास करता येणार नाही, असे समजले व त्यांना माघारी फिरावे लागले.

झाले असे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या प्रकरणी राज्य सरकारने राज्यपालांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे दमनकारी आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी  क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद ठाकरे सरकारच्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांनी विधानपरिषेदच्या १२ जागांबाबत आता अंत पाहू नये, असं म्हटलं होतं.

शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरून असो वा आता रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरून असो, हा वाद वाढतच आहे. आयआयएफसीएल (IIFCL) कंपनीला काम देण्याच्या प्रस्तावावरून सध्या मुंबई विद्यापीठात राज्यपाल विरुद्ध युवासेना संघर्ष पेटला आहे.

दरम्यान, आता सरकारच्या या निर्णयामुळे हा राज्यपालांचा असा अपमान होण्यावरून पुन्हा राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद चिघळण्याची शक्यता बळावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER