अखेर ठाकरे सरकारने चूक सुधारली; इंदू मिलच्या कार्यक्रमाचे आंबेडकरांना निमंत्रण

मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या (Mumbai Indu Mill) जागेवर उभारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. परंतु, या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) व परिवारालाच निमंत्रण देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरलेत. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.  अखेर सरकारला त्यांची चूक उमजली व आनंदराज यांना कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे.

आनंदराज यांच्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारने ही जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली. मोठं आंदोलन करत इंदू मिलचे दरवाजे आणि पोलिसांचा मोठा ताफा फोडत आंदोलन केलं होतं. सरकारने बाबासाहेबांच्या कुटुंबातील सदस्यांनाच आमंत्रित न केल्यामुळे तीव्र नाराजी उमटली होती.

अखेर ११.३० वाजताच्या सुमारास एमएमआरडीएकडून एक पत्रक प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

याबाबत आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले की, “आपण स्मारकाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थितीत केले होते. त्यामुळे मला न बोलवण्याचा प्रयत्न होता. पण, आता सरकारकडून निमंत्रण मिळाले आहे. आपण या कार्यक्रमाला जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास निकृष्ट कामाची बाजू मांडणार आहोत.”

दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाची माहिती आणि निमंत्रण देण्यात आले नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. तर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सध्या पुण्यात आहेत.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर , स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थिती राहणार आहेत.

ही बातमी पण वाचा : इंदू मिल स्मारक: डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ, अनेक मंत्री नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER