अखेर मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये मनोमिलन; राज्यपालांचा सरकारी विमानाने प्रवास

CM Uddhav Thackeray-Bhagat Singh Koshyari

मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने (Shivsena) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यात कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून वाद रंगत होता. मात्र आता हा वाद निवळल्याचे चित्र आज बघायला मिळाले. मागच्या महिन्यात राज्यपालांना सरकारी विमान प्रवास नाकारणाऱ्या ठाकरे सरकारने आज मात्र सरकारी विमान प्रवासाची परवानगी देऊन तसे संकेत दिले आहेत.

मात्र, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना शुभेच्छा देऊन हा संवाद पुन्हा सुरू केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेही एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य सरकारने राज्यपालांना विमान देऊन राज्यपालांच्या कृतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा प्रभार होता. मात्र काल केंद्र सरकारने गोव्याच्या राज्यपालपदी निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांची नियुक्ती केली.

आज ते पदभार स्वीकारणार असल्याने भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी मागितली होती. यावेळी ठाकरे सरकारने कुठलाही वेळ न लावता त्यांना सरकारी विमान वापरण्याची परवानगी दिली. यावरून ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये असलेला वाद निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button