ठाकरे सरकारकडून मराठा समाजाला मोठा दिलासा ; मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार

मुंबई :- मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी आता ठाकरे सरकारने (Thackeray Goverment) मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS (Economic Weaker ) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार आहे, त्यासाठी १० टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीतही मराठा उमेदवार या आरक्षणाचा १० टक्के फायदा घेऊ शकणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाजातील काही संघटनांकडून ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला द्यावं, अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्य सरकारनं मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येईल. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात आणि नोकरीमध्ये ईडब्ल्यूएसच्या १० टक्के  आरक्षणाचा लाभ मराठा युवकांना मिळणार आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणासाठी दिल्लीवरच धडक द्यावी लागेल – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button