ठाकरे सरकारचे अस्त्र, अखेर राज्यपालांना नमते घेत आमदारांची नियुक्ती करावीच लागेल?

Bhagat Singh Koshyari-CM UddhavThackeray

मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून राज्यपालांच्या आडमुठी भूमिकेमुळे रखडलेल्या विधानपरिषदेवरील 12 आमदारांच्या (12 MLA’s) नियुक्तीसाठी आता ठाकरे सरकारने(Thackeray Govt) मोठे अस्त्र बाहेर काढले आहे. या अस्त्रांच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) यांना नमते घेत राज्यपालांची नियुक्ती करावीच लागणार असे बोलले जात आहे. राज्यपालांवर (Governor) कायदेशीर दबाव निर्माण करुन किमान काही नावांना मंजुरी मिळवण्याचा ठाकरे सरकारचा डावआखल्याची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यापूर्वीदेखील ठाकरे सरकारकने अनेकदा 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं सोपवली आहेत. त्यानंतर स्मरणपत्र पाठवून राज्यपालांना वेळोवेळी या गोष्टीची आठवणही करुन देण्यात आली. सुरुवातीच्या काळात राज्यपालांकडून या विलंबासाठी कोरोना संकटाचे कारण समोर केले जात होते. मात्र, आता कोरोनाची पहिली लाट ओसरुन दुसरी लाट येण्याची वेळ आली तरीही राज्यपाल कोश्यारी याबाबत कोणताही निर्णय घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता नाइलाजास्तव ठाकरे सरकारने कायदेशीरबाबींची रणनीती आखली आहे. त्यासाठी अ‍ॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारकडून एक पत्र लिहण्यात आले आहे. हे पत्र आता राज्यपालांना पाठवण्यात जाईल. या पत्रात कायदेशीर युक्तिवाद करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्यपाल 12 पैकी सरकारने सुचविलेल्या काही नावांना तरी मंजुरी देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी

ही बातमी पण वाचा : ‘मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER