ठाकरे सरकारची उधळपट्टी; ऊर्जामंत्र्याच्या बंगल्यावर कोट्यवधीचा खर्च, भाजप आक्रमक

Thackeray government's waste; Billions spent on energy minister's bungalow, BJP aggressive

मुंबई :- एकीकडे कोरोनामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, उद्योजक यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधींची उधळपट्टी करण्यात येत आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या सरकारी बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे भाजप अधिकच आक्रमक झाली आहे.

राज्यात कोरोनामुळे सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. तर दुसरीकडे वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेले आहेत. मात्र असे असताना मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी केला आहे. या संदर्भात पाठक यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन यांचे बंगले आणि कार्यालयात होणाऱ्या नुतनीकरणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सगळ्या नुतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असल्याचा आरोप पाठक यांनी केला आहे.

एकीकडे वाढीव वीजबिलात कुठलीही सूट द्यायची नाही आणि त्याचा नाहक भुर्दंड सर्वसामान्यांना भोगावा लागत असताना मंत्र्यांच्या बंगले आणि कार्यालयांच्या नुतनीकरणावर कोट्यावधी रुपये कसे खर्च केले जातात, असा सवाल पाठक यांनी केला आहे. या सगळ्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पाठक यांनी केली आहे. यापूर्वीही पाठक यांनी कोरोना काळात उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या चार्टर्ड विमान प्रवासाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. कोरोना काळात एकीकडे राज्यात सगळ्या खर्चांवर मर्यादा आल्या होत्या. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना असा खर्च होत असेल तर मंत्री मस्त आणि जनता त्रस्त असंच म्हणावं लागेल, असंही ते पुढे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : नितीन राऊत यांचं ऊर्जामंत्रिपद धोक्यात, दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER