ठाकरे सरकारच्या तीन विकेट पडणार निश्चित, पहिली आव्हाडांची : किरीट सोमय्या

Kirit Somaiya-CM Thackeray

मुंबई : येत्या काही दिवसात ठाकरे सरकारच्या तीन विकेट पडणार, असे भाकित भाजपा प्रवक्ते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वर्तवले आहे. गृहराज्य मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) म्हाडा जमीन घोटाळा प्रकरणी घरी बसणार, असे ते म्हणाले.

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आज किरीट सोमय्या ठाणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आले होते. जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार, असा सवाल यावेळी त्यांनी केला. त्यांना अटक का होत नाही, असे त्यांनी विचारले. आमदार निरंजन डावखरे, भाजपा नगरसेवक मनोहर डुंबरे त्यांच्यासोबत उपस्थित होते.

टीआरपी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख चॅनेलवाल्यांना का घाबरत आहेत? एफआयआरमध्ये दुसरेच नाव आहे. ठाकरे सरकार आल्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये टाकण्याची का धडपड करत आहेत, असंही ते म्हणाले.

विरोधी पक्ष म्हणून आम्ही ‘कोव्हिड-19’मध्ये पूर्ण जबाबदारीने काम करत आहे. कोव्हिड-19 मध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. हे सरकार त्यांच्या पापानेच पडणार असा टोमणा किरीट सोमय्या यांनी मारला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एसआरए प्रकरणात खोटे बोलत आहे. याबाबत आम्ही पुढे जनहित याचिका टाकणार आहोत.

आज विजेचे बिल आव्वाच्या सव्वा आले आहेत. ठाकरे सरकार उत्तर देऊ शकले नाही, मला विश्वास आहे आम्हाला न्याय मिळणार, असे सोमय्या म्हणाले. शीतल दामा मृत्यू प्रकरणात अधिकारी आणि काँट्रॅटरवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.

ट्विटमध्ये ते म्हणाले – शीतल दामा ज्या मेनहोलमध्ये पडल्या अशी शंका आहे तिथे आम्ही जाऊन पाहिले. त्या मेनहोलमध्ये माणूस पडू शकतो. शीतल यांच्या मृत्यूबद्दल नागरिक अत्यंत संतप्त आहेत. मनपाच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER