ठाकरे सरकारची पोरे हुश्शार, पटकवला नकोसा पहिला नंबर! – भाजपाचा टोमणा

Maharashtra Today

मुंबई : कोरोनाच्या (Corona)दुसऱ्या लाटेचा धोखा राज्यावर घोंगावत असून, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २५,८३३ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईने दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे., नवे ३,०६२ रुग्ण सापडले आहेत. राज्यात गेल्या सहा दिवसांत नव्या रुग्णांची संख्या एक लाख नऊ हजार १७८ झाली आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाख ७७ हजार ५६० इतकी आहे.

यावरून महाराष्ट्र भाजपाने (BJP) राज्यातील ठाकरे सरकारला(Thackeray govt) ट्विट करुन टोमणा मारला आहे – देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्राने दिल्यावरही ठाकरे सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टाने हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला असे म्हणत ”ठाकरे सरकराची पोरं हुश्शार…!

४८ तासांमध्ये सज्ज व्हा

जुलै २०२० मधील स्थितीशी तुलना करता, मुंबईतील शासकीय रुग्‍णालयांमधील खाटांची संख्‍या अधिक आहे. पालिका रुग्‍णालयांमध्‍येदेखील ही क्षमता वाढविण्‍यात येत आहे. त्‍याच धर्तीवर सरकारी रुग्‍णालयांप्रमाणे सर्व खासगी रुग्‍णालयांनी पुन्‍हा कोविड खाटांची संख्या येत्‍या ४८ तासांमध्‍ये वाढवावी, अशी सूचना मुंबई पालिका आयुक्तांनी केली आहे. यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू खाटा असाव्यात, त्यासाठी साधनसामग्री व मनुष्‍यबळ आदी सर्व व्‍यवस्‍था युद्धपातळीवर करून सर्व कार्यवाही पूर्ण केल्‍याची माहिती रुग्‍णालयांनी ४८ तासांची मुदत संपताच पालिकेला द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER