ठाकरे सरकारचा घोटाळा कधीही बाहेर येईल; काँग्रेस नेत्याची थेट सोनियांकडे तक्रार

Uddhav Thackeray - Sonia Gandhi

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद पुन्हा चव्हाटयावर आला असल्याचे पाहायला मिळाले . मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू रॉय (Vishwabandhu Roy) यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेविरोधात तक्रार केली आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना तसे पत्रच रॉय यांनी दिले आहे.

शिवसेना नेत्यांचे घोटाळ्यांमध्ये नाव येत असल्याने त्याचा धोका कांग्रेसला असल्याची तक्रार विश्वबंधू रॉय यांनी केली आहे. सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल, अशी भीतीही रॉय यांनी पत्रात नमूद केली आहे. विश्वबंधू रॉय यांनी यापूर्वीही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले होते .

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) मिळून काँग्रेसला (Congress) संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप रॉय यांनी केला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबतची आघाडी पुढे चालून काँग्रेसला धोक्याची ठरु शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER