कोविड रुग्णालयाच्या कामात ठाकरे सरकारचा १२ हजार कोटींचा ‘महाघोटाळा’; किरीट सोमय्यांचा आरोप

Kirit Somiya & Uddhav Thackeray

मुंबई : कोविड काळात पाच हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याच्या नावाखाली स्वतः  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशावर १२ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेत, उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी ७२ तासांच्या आत एका खाजगी बिल्डराची पाच – सातशे कोटींची जागा तीन हजार कोटीत विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला. हे रुग्णालय उभे करण्यासाठी सात हजार कोटी, जमिनीसाठी तीन हजार कोटी तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दोन हजार कोटी मंजूर करण्यात आले.

हे करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही. उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात, आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांशी, महानगरपालिका अधिकाऱ्यांशी किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी चर्चा न करता ‘कोविड टास्क फोर्स’च्या बैठकीत चर्चा केली आणि या चर्चेनंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने हा प्रस्ताव पास करण्याची तयारी केली, असे सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या आंनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरे यांना हे रुग्णालय उभे करायचे नाही.

फक्त आपल्या जवळच्या बिल्डरला दोन हजार कोटींचा फायदा करून देण्यासाठी हा घोटाळा केला जात आहे. यावर आक्षेप घेतल्यानंतर हा प्रस्ताव सध्या थांबवण्यात आला आहे. या संदर्भात मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन लोकायुक्तांकडून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी करणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER