सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारच्या हालचाली?

CM Thackeray-Local Train

मुंबई : ठाकरे सरकार  (Thackeray Govt) मुंबईकरांना दिवाळीचं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल ट्रेन सर्वांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेन (Local Train) सुरू करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ट्विटरवर एका प्रवाशाने याबाबत एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं. लवकरच लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी सरकार कामाला लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद आहे. सरकार मिशन बिगेनच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन प्रवाशाची सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सरकारकडून सर्व महिलांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. आता राज्य सरकार सर्वांसाठी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

.