पोलीस खात्यात ठाकरे सरकारच्या हस्तक्षेप … – फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई : पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. यावरुनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील सरकार पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला.

फडणवीस म्हणालेत, मुख्यमंत्र्यांनी देखरेखीचे काम करणे अपेक्षित असते. मात्र बदलीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या सरकारचा हस्तक्षेप होताना दिसतो. सरकारच्या अशा कारभाराला कंटाळूनच महासंचालकांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नाही.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

केंद्रातून राज्यात परतल्यानंतर युती सरकारच्या काळात जयस्वाल यांची आधी मुंबई पोलीस आयुक्त आणि गेल्यावर्षी पोलीस महासंचालकदी नियुक्ती झाली होती. पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून महासंचालक जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभाग यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रात जाण्याची मागितलेली परवानगी राज्य सरकारने लगेच मान्य केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८५ च्या तुकडीतील जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER