ठाकरे सरकारची ‘मी जबाबदार’ घोषणा; वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण : सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar - CM Uddhav Thackeray

मुंबई : भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कोरोना (Corona), आरोग्य सुविधा, नोकरभरती, संजय राठोड प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री वाढत्या कोरोनावर चिंता व्यक्त करत ‘मी जबाबदार’ अशी घोषणा करतात, पण वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. सामान्य जनता जबाबदारीने वागत असते. मंत्री मोर्चे काढतात, वाढदिवस साजरे करतात.

विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली पाहिजे. कोरोनाशी लढण्यासाठी ठोस योजना करणे आवश्यक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. कोरोना संकटातही राज्य सरकारने आरोग्य खात्याचे बजेट वाढवले नाही. सरकारने ४ मे रोजी आरोग्य खात्यात नोकरभरती करण्यास परवानगी दिली. पण, तेव्हापासून त्यांनी काहीच पावले उचलली नाहीत. हे सरकार मे २०२० पासून नोकरभरती करू शकले नाही, असा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला.

आरोग्य सुविधांवर काम करण्याची गरज

सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व आरोग्य सुविधासंदर्भात तातडीने आणि नव्याने आखणी करण्याची आवश्यकता आहे. सरकारने आता लेखानुदान मांडावे आणि त्यानंतर बजेट जुलैमध्ये अधिवेशनात मांडावे, असे म्हणाले.

संजय राठोडप्रकरणावरून टीका

मुनगंटीवार यांनी संजय राठोड प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. राज्यात सुरू असलेली ही नवीन परंपरा योग्य नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न झाले, ते पोलिसांनी सांगितले पाहिजे. ज्यांच्यावर आरोप आहे ते स्वतः बद्दल कसे काय सांगू शकतात, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER