ठाकरे सरकारमधील ‘फाईल घोटाळा’ उघड ; मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

Ashish Shelar-Uddhav Thackeray

मुंबई : विधानसभेत पुरवणी मागण्यांवरून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पुरवणी मागण्यांवर बोलताना भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंत्रालयातील एक गंभीर ‘फाईल घोटाळा’ उघड केल्याचा दावा केला आहे.

आशिष शेलार यांनी सांगितलं की, राज्याच्या जनतेने आजपर्यंत अनेक घोटाळे पाहिले आहेत. त्यापेक्षा अनोखा घोटाळा या आघाडी सरकारच्या काळात घडला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागातील पवार नावाच्या अभियंत्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ती फाईल फिरत सचिव, मंत्री यांच्यापर्यंत आल्यावर चौकशीचे आदेश कायम ठेवण्यात आले पण ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर त्यावर लाल शाईने शेरा मारुन चौकशीची गरज नाही, असं सांगण्यात आलं. मात्र, त्यानंतर ही फाईल पुन्हा संबंधित मंत्र्यांकडे आल्यावर ही बाब निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय बदलला. याबाबत मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी आपण खालून आलेला निर्णय बदलेला नाही, असं सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर या फाईलवर शेरा कुणी मारला? अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्यावर शेरे मारले जात असतील तर या सरकारच्या काळातील सगळ्याच निर्णयाच्या फाईलची चौकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर ही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. चौकशी करु आणि एफआयआर दाखल करु असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा पद्धतीने राज्य कारभार सुरु आहे, असा गंभीर आरोप करीत हा घोटाळा आमदार आशिष शेलार यांनी उघड केला असल्याचा दावा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER