ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी सर्वांत फसवी! फडणवीसांचा टोमणा

devendra fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाला. यातल्या शेतकरी कर्जमाफीवर टीका करताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी – ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी सर्वांत फसवी, असा टोमणा मारला.

फडणवीस म्हणाले की, ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या अर्थसंकल्पाने पूर्ण निराशा केली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांसाठी काहीही नाही. दोन लाखांवर कर्ज असणाऱ्यांसाठी ‘ओटीएस’ आणणार होते. त्यासाठीही तरतूद करण्यात आली नाही. सुमारे ४५ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारची कर्जमाफी सर्वांत फसवी कर्जमाफी आहे.

शेतकऱ्यांना सोयाबीन, कापसावरची बोंडअळी, खोडकिडी आणि धानासाठी काहीही मदत करण्यात आली नाही. वीज बिलासंदर्भातदेखील सरकारने फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना आलेल्या वीज बिलावर व्याज लावण्यात आले आहे. वीज बिलासंदर्भातील घोषणेचा शेतकऱ्याला काहीही फायदा होणार नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही घोषणादेखील फसवी आहे. राज्यात अल्पभूधारक शेतकरी अधिक असल्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही, असे फडणवीसांनी सांगिलते.

अनेक योजना केंद्र सरकारच्या असून त्यासाठी केंद्राकडून निधी मिळतो. केंद्राच्या मदतीने अनेक योजना पूर्ण होत असताना राज्य सरकारकडून केंद्र सरकारला नावं ठेवली जातात! आजचे बजेट हे राज्याचे होते की, मुंबई मनपाचे, असा टोमणाही फडणवीसांनी मारला.

ही बातमी पण वाचा : रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER