ठाकरे सरकारकडून वाढीव लॉकडाऊनचा निर्णय; आनंद महिंद्रांनी केले कौतुक!

uddhav Thackeray and Anand Mahindra

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात आणखी १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगितले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती (Corona Crises), वैद्यकीय यंत्रणांची उपलब्धता पाहून त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत किंवा वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. जिल्हापातळीवर आढावा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला रिट्विट करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. पारदर्शी, सक्रिय आणि दिलासा देणारे विधान मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केले आहे. त्यांचे हेच दिलासादायक आणि व्यवहार्यपूर्ण विधान ऑक्सिजनची पूर्तता आणि टीपी रेटला धरून आहे, असे आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी म्हटले आहे.

बैठकीनंतरही केलं होतं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगपतींसोबत कोरोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती, तिसऱ्या लाटेचा जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये, यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा सांगितला. तसेच, वेगवान लसीकरण याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. यांचेदेखील अनुभव सांगतानाही महिंद्रांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले होते. आज पुन्हा तसेच ट्विट महिंद्रा यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button