ठाकरे सरकारचा निर्णय, खासगी आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला असून, ठाकरे सरकारही कोरोनाला थोपवण्यासाठी उपाययोजना करत आहे. परंतु ठाकरे सरकारच्या या उपाययोजना तोकड्या पडताना दिसत आहेत. राज्यात दररोज ६० हजारांच्या घरात कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरे मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाकडून शासन अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. त्यालाही ठाकरे सरकारने मंजुरी दिली.

शासन अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू. सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापण्यास मान्यता. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देण्याचा निर्णय. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरीत करण्याचा निर्णय. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीनीकरण करण्याचा निर्णय. कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button