ठाकरे सरकारचा निर्णय: राज ठाकरेंची झेड सुरक्षा हटवली

Uddhav Thackeray-Raj Thackeray

मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांना देण्यात येणारी झेड सुरक्षाही (Z Security) हटवण्यात आली आहे. त्यामुळे आत मनसे ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात कुठली भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्यानंतरसुद्धा ही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी यापूर्वी दिलेला आहे. या अहवालात फडणवीसांच्या जीवाल अनेक बाजूने धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फडणवीसांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांसोबतच गुप्तचर यंत्रणेनं हा अहवाल दिला आहे. असे असताना सुद्दा फडणवीसांच्या सुरक्षेत कपात केलेली आहे. मुंबई पोलिसांनी फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याच अहवाल दिल्यांनतर त्यांच्या सुरक्षेत कपात न करण्याची शिफारस करण्यात आली होती. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनीसुद्धा फडणवीसांच्या सुरक्षा कपातीला विरोध केला होता. मात्र, जैस्वाल यांची बदली होताच सुरक्षा कपातीचा हा निर्णय घेतला गेला आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारचा निर्णय, फडणवीसांची बुलेटप्रूफ गाडी काढली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER