ठाकरे सरकारचा निर्णय; राज्यात लॉकडाऊन वाढला, १ जूनपर्यंत कडक निर्बंध राहणार

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona infection) वाढत असल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे १५ मेपर्यंत कायम होते. त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून १ जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असेल. या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे.

हा अहवाल प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासांमधील असणं आवश्यक आहे. या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे. त्याचबरोबर परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठीदेखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.

ब्रेक द चैन नवी नियमावली

१) किराणा दुकाने- सकाळी ७ ते ११
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री- सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री- सकाळी ७ ते ११
५) अंडी,मटण, चिकन, मासे विक्री- सकाळी ७ ते ११
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
७) पशुखाद्य विक्री- सकाळी ७ ते ११
८) बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने ७ ते ११
९) पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी ७ ते ११
१०) येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी ७ ते ११

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button