ठाकरे सरकारचा निर्णय : लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला

मुंबई : राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारकडून शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे.

दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं समोर आलं. खरंतर, मिशन बिगिनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER