ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mantralaya - IAS Transfer

राज्य राज्य सरकारकडून सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, तर दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांची नियुक्ती झाली आहे. एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदी कार्यरत असलेल्या आर.ए.राजीव यांचा कालावधी संपुष्टात होता. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपण्यात आला होता. राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद म्हैसकर हे १९९३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, याशिवाय ते महसूल आणि वन विभागातही प्रधान सचिव म्हणूनही कार्यरत होते.

दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी एस.व्ही.आर.श्रीनिवास हे १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. याशिवाय लोकेश चंद्रा (प्रधान सचिव र.व का.) यांची नियुक्ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर करण्यात आली आहे. तर विकास चंद्र रस्तोगी यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.), सामान्य प्रशासन विभाग येथे करण्यात आली. सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक बी. वेणुगोपाल यांची नियुक्ती मिलिंद म्हैसकर यांच्या जागी प्रधान सचिव (वने) या पदावर करण्यात आली आहे. तर सुमंत भांगे यांची नियुक्ती सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(२) या पदावर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचा कार्यभार होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button