ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढला

CM Uddhav Thackeray - Lockdown

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा एकदा वाढवण्यात आला. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढविले असून, राज्यात १५ मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना यासंदर्भातले संकेत दिले होते. राज्यात १५ दिवस किंवा त्याहून जास्त काळासाठी लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मेपर्यंत कायम राहतील असं जाहीर केलं आहे.

राज्यात १४ एप्रिलपासून सरकारने कोरोनाबाबतचे (Corona) निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता. आधीच्या आदेशांनुसार हे निर्बंध १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते. मात्र, राज्यातील रुग्णवाढीचा दर आणि मृतांची वाढतच जाणारी संख्या पाहता लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची भूमिका अनेकांनी मांडली होती. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनीदेखील त्यासंदर्भात स्पष्ट मत मांडलं होतं. राजेश टोपे यांनीदेखील बोलताना लॉकडाऊन वाढवावाच लागेल अशीच राज्यातली परिस्थिती आहे, असं म्हटलं होतं. त्यानुसार आता राज्य सरकारने त्यासंदर्भात आदेश काढले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button