ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना पाच लाखांचे अर्थसाह्य

CM Uddhav Thackeray

मुंबई :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रालाही बसला. दरम्यान, या काळात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. तसंच अनेक मुलं अनाथ झाली आहेत. अशा अनाथ झालेल्या मुलांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आज  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पाच  लाखांचं अर्थसाह्य  देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाची साथ खूप वाईट आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार आहे. कोरोनाच्या या लाटेत अनेकांनी आपले मित्र, नातेवाईक गमावले. काहींनी आपली मुलं गमावली तर काही मुलांनी आपल्या पालकांना गमावलं. त्या मुलांना एकटं सोडणार नाही. यासंदर्भात लवकरच एक योजना तयार केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यापूर्वी जनतेशी संवाद साधताना म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : कोरोनामुळे झालेल्या अनाथांच्या भवितव्याला आकार देण्याचे काम आपले : सुप्रिया सुळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button