कोणी चाणक्य बिणक्य आला तरीही ठाकरे सरकार मजबुतीने उभं राहील : छगन भुजबळ

Uddhav Thackeray - Chhagan Bhujbal

नाशिक : कोणी चाणक्य बिणक्य महाराष्ट्राच्या भूमीत चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काहीही हाती आले नाही, अशी प्रतिक्रिया अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिकमधील (Nashik) येवला मतदारसंघात नवीन बांधण्यात आलेल्या तालुका पोलीस प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ही प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या कोकण दौऱ्यापूर्वी खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल. भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर भुजबळांनी स्पष्ट केले.

राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकार बनवण्यासाठी शिडीची गरज भासणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना अगोदर सरकार पाडून तर दाखवा, मग शिडी लावायची कि शिडी बॉम लावायचा हे नंतर ठरवू, असा टोला भुजबळांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही अदानींची भेट घेतली होती. यावर भुजबळांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले. पवार साहेबांना सगळेच लोक भेटत असतात. फडणवीसांच्या काळातील वीज थकबाकी ही 50 हजार कोटींच्या घरात आहे. जर वीज बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी बुडाल्याशिवाय राहणार नाही आणि बाकीच्या लोकांना हे हवे आहे. जेवढे अडचणीत येईल तेवढे बघायला अदानी आणि अंबानी आहेतच, अशा टोला भुजबळ यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER