‘लोक झोपेत असताना ‘ठाकरे’ सरकार पडेल हे नक्की’, चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा दावा

Chandrakant Patil-Thackeray Govt

कोल्हापूर :- राज्यात एकीकडे विरोधक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार लवकरच पडेल, असा दावा करत असताना महाविकास आघाडीमधील नेते मात्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. त्यातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारबाबत नवं भाकीत वर्तवलं आहे. महाराष्ट्रातील जनता झोपेत असताना ठाकरे सरकार (Thackeray Govt) पडेल हे नक्की, असं खळबळजनक विधान पाटील यांनी केले आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे.

‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मध्यंतरी झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं इतका विश्वासघात झाला असं म्हणाले होते. केसाने गळाने कापतात म्हणतात तसंच काहीसं घडलं. तुम्ही सरकार कधी पडणार असं विचारत आहात तर मी सांगतो की, असेच सगळे लोक झोपेत असताना सरकार पडेल हे नक्की. कोणाला कळणारही नाही की हे सरकार कधी पडले,’ असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : याच मोदींनी संभाजीराजेंना राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली : चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button