ठाकरे सरकारला महाराष्ट्राचा ‘बंगाल’ करायचा आहे- निलेश राणे

Nilesh Rane

रत्नागिरी : ठाकरे सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) सरसकट तपासासाठी बंदी घातली आहे. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला राज्यात तपासाला येण्यास बंदी घातल्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. या निर्णयाद्वारे सरकारला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

काही गोष्टी लपवण्यासाठी असा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सीबीआयला सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेने तपासाची परवानगी मिळते, राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागत नाही. आपले काळे धंदे लपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. हे सरकार बिनडोक असल्याचे, राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बंगाल राज्यात जसे रोज मर्डर होतात, हिंदूंच्या सणांवर बंदी घातली जाते, बंगाल सरकारच्या विरोधात जे लोक बोलतात ते भररस्त्यात फोडले जातात, पोलिसांना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वापरले जातात… महाराष्ट्रात हे व्हायला वेळ लागणार नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER