ठाकरे सरकार देवेंद्र फडणवीसांसाठी रद्द करणार ‘ही’ महत्त्वाची बैठक?

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर सरकार आणि विरोधकांची आज बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. आजच्या या बैठकीला सर्वपक्षीय नेते हजर आहे. परंतु, बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बिहारच्या दौऱ्यावर आहे. देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी बिहारहून परत मुंबईत येणार आहे.

या बैठकीसाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मराठा आरक्षणावर राजकारण न करता एकत्र येऊन तोडगा काढला जाणार आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने बाजू मांडली आहे. पण मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. आत जी गरजेची स्थगिती नव्हती, ती देण्यात आली आहे हे अनाकलनिय आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.फडणवीस मुंबईत परतल्यावर त्यांच्याशी संपर्क साधून सरकार नंतर बैठकीची वेळ ठरवणार असल्याची माहिती आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER