‘ठाकरे’ सरकारने निर्लज्ज राजकारण करणे बंद करावे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा सल्ला

CM Uddhav Thackeray - Piyush Goyal

नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्रात आणि देशभरात देखील करोनाचे (Corona) रुग्ण आणि करोनामुळे होणारे मृत्यू यामध्ये मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लस तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर थेट रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी’, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे.

ऑक्सिजनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले. भारत सरकार सर्व भागधारकांसह, भारतात जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन सुनिश्चित करत आहे. आम्ही सध्या ११० टक्के ऑक्सिजन उत्पादन क्षमता तयार करीत आहोत आणि उपलब्ध सर्व ऑक्सिजन औद्योगिक वापरापासून वैद्यकीय वापराकडे वळवित आहोत. देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी केंद्र सरकार दररोज राज्य सरकारांशी संपर्क साधत आहे. कालच पंतप्रधानांनी आपल्या आढावा बैठकीत सांगितले की या संकटात केंद्र व राज्यांनी सहकार्याने काम केलं पाहिजे.

या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून क्षुल्लक राजकारणाचे खेळ पाहून आश्चर्यचकित आणि दु: खी झालो. त्यांनी राजकारणाचे रोजचे डोस देणं थांबवून जबाबदारी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सध्या अपंग व भ्रष्ट सरकारचा त्रास सहन करीत आहे आणि केंद्र जनतेसाठी चांगले प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील लोक ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ कर्तव्यदक्षपणे अनुसरण करीत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी ‘माझं राज्य, माझी जबाबदारी’ या भावनेने कर्तव्य बजावावे, असे ट्विट पियुष गोयल यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button