ठाकरे सरकारने महापुरुषांच्या यादीतून संत नामदेव महाराजांचे नाव वगळले!

Chandrakant Patil & Uddhav Thackeray

मुंबई : राज्य सरकारकडून दरवर्षी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी जाहीर केली जाते. यंदाच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव वगळले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यादीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव नसल्याने नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठानचे चंद्रकांत पाटील यांना निवेदन

यासंदर्भात आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने मला निवेदन दिले, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली व आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा विषय लावून धरू, पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER