शरद पवारांच्या दराऱ्यामुळे ठाकरे सरकारने पायाभरणी सोहळा पुढे ढकलला

Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई :- पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे उघड झाले आहे. महाविकास आघाडीचे कर्ताधर्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी सोहळ्याचे निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे उघड झाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कार्यक्रम ठरवताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप या मंत्र्यांनी केल्याची माहिती पुढे आली आहे. यासाठीच हा सोहळा अचानकच पुढे ढकलण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर बोलून दाखवली. पायाभरणी सोहळ्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी होती. त्यामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद नको म्हणून तूर्तास कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर ओढवली. विशेष म्हणजे शरद पवार यांनाच निमंत्रण देण्यात आले नसल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांचा अहमदनगरमधल्या 23 गावांसाठी पुढाकार, संरक्षणमंत्री राजनाथ सिहांची घेतली भेट

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार (Ajit Pawar) यांनाही काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. ते पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.

स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता. शरद पवारांनी स्मारकाच्या बदललेल्या आराखड्याची इंदू मिल इथे जाऊन पाहणी केली होती. मात्र, शरद पवारांनीही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER