फडणवीसांचा टोमणा : ठाकरे सरकार ‘पलटूराज’; बदल्या करा अन् माल कमवा धोरण

CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

पिंपरी : राज्य सरकार रोज घोषणा करते आणि मागे घेते. पलटूराज सरकार आहे. वर्षभर बदल्या करा आणि माल कमवा, हे त्यांचे धोरण आहे. सगळीकडे बदल्यांसाठी  दलालांचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका भाजपाचे (BJP) नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

ते चिंचवड येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते. भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, निरंजन डावखरे, महापौर उषा ढोरे, महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, “अनैसर्गिक सरकार निर्माण केले. त्याचे परिणाम आपण पाहात आहात.” फडणवीस म्हणाले, “राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे. महाराष्ट्र सरकारने कोणालाही मदत केली नाही.

समृद्ध राज्याने तुम्ही तुमच्या, आम्ही आमच्या घरी सुखरूप राहा एवढेच सांगितले. ही दुर्दैवी बाब आहे. मदत करायची सोडून न वापरलेल्या विजेचे भरमसाट  बिल दिले. दोन खोल्यांसाठी  २० हजार रुपये बिल आले आहे! वीज वापरलीच नाही तर बिल का भरावे? जी बिले वाढीव आहेत त्याला आमचा विरोध आहे. राज्य सरकार रोज नवी घोषणा करते आणि मागे घेते. पलटू सरकार आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER