ठाकरे सरकार हतबल, EWS मधून मराठ्यांना आरक्षण नको ; शरद पवारांनी स्वतः लक्ष घालावं – संभाजी राजे

Uddhav Thackeray - Sharad Pawar - Sambhaji Raje

मुंबई :- Ews मधून मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) दिलं हे चुकीचं असल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले आहेत. तसेच, Ews मधून आरक्षण देून सरकारने पळवाट काढली असल्याचा संताप संभाजीराजेंनी व्यक्त केला. एवढेच नाही तर या प्रकरणात आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः लक्ष घालावे अशी साददेखील राजेंनी घातली.

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) मराठा विद्यार्थ्यांना Ews चा लाभ मिळणार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर आज संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी पत्रकार परिषद घेऊन Ews मधून दिलेले आरक्षण कसे फसवे आहे यावर भाष्य केले.

संभाजी राजे म्हणाले, ‘मराठा समाजाचा आवाज प्रथम मी मांडला’ . EWS मधून मराठ्यांना आरक्षण दिलं हे चुकीचं आहे. EWS हे वडापावसारखं सगळ्यांचच आहे. EWS हे फक्त मराठा समाजासाठी नाही’ EWS हे ओपन कॅटगरीसाठीदेखील आहे. तसेच, यामुळे ‘SEBC’ला धोका निर्माण होईल’. EWS घेतलं तर SEBCतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही’. EWS मधून मराठ्यांना आरक्षण नको आहे. सरकारी वकिलांनीच हा सल्ला दिला होता. सरकार घाबरलं म्हणून EWS मधून मराठ्यांना आरक्षण देऊन सरकारने पळवाट काढल्याचा आरोपही संभाजीराजेंनी केला आहे.

एवढेच नाही तर, राज्य सरकार हतबल झालं असल्याची टीकाही संभाजीरांजेनी केली. कोर्टात गडबड झाली तर सरकार जबाबदार राहील असेही संभाजी राजे म्हणाले.

‘EWS हे कोणत्या एका जातीसाठी नाही’ EWS वडापावसारखं, त्यात सगळेच आले’ शरद पवारांनी यात लक्ष घालावं. त्यांनी लक्ष घातल्यास यातून मार्ग निघू शकेल असेही संभाजीराजे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय ; मिळणार EWS चा लाभ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER