ठाकरे सरकार चर्चेपासून पळ काढते आहे; फडणवीस यांचा आरोप

devendra fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील आरक्षणाबाबत भीतीचं वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढणाऱ्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घ्या, अशी आम्ही मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने ती अमान्य केली.

केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार चर्चेपासून पळ काढते आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सर्व भागांत शेतकरी प्रचंड संकटात आहे. काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला चपराक दिली आहे.

या स्थितीत फक्त विधान मंडळात याबाबतच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. परंतु, सरकार चर्चेपासून पळ काढते आहे. सरकार इतर व्यवहार अनलॉक करते आहे. बहुतेक सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत.  मग, विधान मंडळाचे अधिवेशन का होऊ शकत नाही? जर दोन दिवसांसाठी सगळे सदस्य योग्य ती काळजी घेऊन येणार असतील तर दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्यायला हवे, अशी आमची मागणी होती.

अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न

सरकार सतत विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलत असून आताही केवळ दोन दिवसांचे १४ व १५ डिसेंबर रोजी अधिवेशन ठेवण्यात आले आहे. यापुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची मागणी आम्ही केली आहे.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपाला चांगला प्रतिसाद

धुळे आणि नंदूरबारच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपाचा चांगला विजय झाला आहे. आम्हाला सुरुवातीपासून इथे चांगला प्रतिसाद दिसत होता. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल याचा विश्वास होता.

ही बातमी पण वाचा : सरकार पडू द्या, १०५ चे १५० आमदार कसे होतात; हे तेव्हा दिसेलच – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER