ठाकरे सरकार मनसेला घाबरते, आमच्या मोर्चाला परवानगी का नाही ?

Raj Thackeray - Uddhav Thackeray

मुंबई : भाजपच्या मोर्चाला परवानगी मिळते, पण मनसेच्या मोर्चाला मिळत नाही, कारण ठाकरे सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरतं, अशा शब्दात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले.

लॉकडाऊनमध्ये तसेच त्या नंतरही नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल आल्याने लोक हैराण झाले आहे. अनेकांनी राज ठाकरेंकडे धाव घेत आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेत, मनसेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला.

मनसेने आज राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. (Avinash Jadhav criticizes Thackeray Government for denying permission to MNS Morcha)

“काहीही झाले तरी आंदोलन होणार. किती वेळा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणार? वीज बिलाविरोधात भाजप मोर्चा काढतं, तेव्हा त्याला परवानगी मिळते, मनसे मोर्चा काढतो, त्याला परवानगी देत नाहीत, हा कुठला न्याय? ठाकरे मनसेला घाबरते. हे सरकार उखडून फेकायचं आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वीज बिल सवलतीचा निर्णय घेतला, मात्र काँग्रेसला श्रेय मिळू नये, यासाठी शिवसेनेचा डाव आहे. महाराष्ट्रात आंदोलनं होणारच, मला तडीपार करायचं तर करा” असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

तर, सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर सरकारला मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करेल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम, राज ठाकरे सहभागी होण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER