‘ठाकरे’ सरकार अडचणीत; ‘तो जीआर रद्द करायला भाग पाडू, नाना पटोलेंचा इशारा

Thackeray government-Nana Patole

मुंबई :- मागासवर्गीय पदोन्नतीच्या (Reservation in promotion) कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ७ मे रोजी राज्य सरकारने घेतला. मात्र पदोन्नतीतील आरक्षण एकाएकी रद्द करण्याच्या ठाकरे सरकारच्या (Thackeray government) निर्णयावर सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसनं (Congress) आक्रमक भूमिका घेत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करत तो जीआर रद्द (GR canceled) करण्यास भाग पाडू, असा इशाराच देऊन टाकला.

आमचे मत जाणून न घेता पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. आमच्या मंत्र्यांनीदेखील आम्हाला हीच माहिती दिली. पदोन्नतीतील आरक्षणाचं धोरण राज्य सरकारनं ठरवावं. यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावी असा आग्रह आम्ही धरला आहे. या प्रश्नी मुख्यमंत्र्याशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ, असं पटोले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ देण्याचं मान्य केलं होतं. मात्र तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी त्यांना कोकणात जावं लागलं. त्यामुळे आमच्या भेटीला विलंब झाला, असं पटोलेंनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. या भेटीतून तोडगा निघेल. समस्येचं निराकरण होईल अशी आमची अपेक्षा आहे. पदोन्नतीतील आरक्षण रद्द होण्याचं मूळ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या कार्यकाळात आहे. फडणवीस सरकारनं केलेल्या दिरंगाईमुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. सर्वांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. या भूमिकेतूनच काँग्रेसनं देश उभा केला आहे. मात्र काही जण आता तोच देश विकत आहेत, असं म्हणत पटोलेंनी भाजपला टोला लगावला. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास काँग्रेस वेगळा विचार करणार का, सत्तेतून बाहेर पडणार का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे’ सरकार खुळ सरकार नाही’, संभाजी राजे संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button