‘ठाकरे’ सरकारचा झटका, ७१.६८ लाख ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीस

Thackeray Government-Mahavitaran

नागपूर :- कोरोनाकाळात वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर एकीकडे टीका होत आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वीजबिल थकल्यामुळे हा आर्थिक बोजा राज्य सरकारला वाहावा लागत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने थकित विजबिलाच्या बाबतीत कडक पवित्रा धारण केल्याचे दिसते आहे. ग्राहकांकडे ६० हजार कोटी रुपये थकबाकी साचल्यामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे कारण पुढे करीत महावितरणने थकबाकीदारांना वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. राज्यात ७१ लाख ६८ हजार ५९६ वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत. नोटीसची मुदत ३० जानेवारीला संपेल. त्यानंतर सोमवारपासून वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे.

महावितरणने (Mahavitaran) धडक वसुलीची घोषणा करून २० केडब्ल्यू दाबापेक्षा अधिक ग्राहकांना प्रत्यक्ष आणि अन्य थकबाकीदारांना एसएमएसच्या माध्यमातून १५ डिसेंबरपासून नोटीस पाठविणे सुरू केले आहे. यात थकबाकी भरण्याचे आवाहन करून १५ दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक नोटीस पुणे विभागातील ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. तेथे २४ लाख १४ हजार ८६८ ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस गेल्या आहेत. कोरोनाकाळात पुणे जिल्ह्यातील वीजबिलांची थकबाकी तब्बल 803 कोटींनी वाढली असून ती 1 हजार कोटींच्या घरात गेली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या वीजबिलांची थकबाकी 1081 कोटींवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे महसुली तुटीमध्ये वाढ होत असल्यामुळे आता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

सर्वात कमी ९ लाख ९७ हजार ३९७९ लाख ९७ हजार ३९७ नोटीस औरंगाबाद (Aurangabad) विभागात तर विदर्भात १६ लाख ७९ हजार ९८४ ग्राहकांना नोटीस गेल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळातील वीजबिलात सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER