ठाकरे सरकार वसुलीत मश्गूल… अतुल भातखळकरांची टीका

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : पुण्यात कोरोना लसनिर्मितीचा (Coronavirus Vaccine) मार्ग मोकळा झाला आहे. भारत बायोटेकची सहकंपनी असलेल्या बायोवेटला पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द परिसरातील पूर्ण कार्यरत असलेला १२ हेक्टर जागेवरील कारखान्यात लसनिर्मिती करण्याची परवानगी मिळाली. कोरोनाची सध्याची स्थिती लक्षात घेता केवळ लसनिर्मितीसाठी परवानगी देण्यास हरकत नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने कंपनीला या कारखान्यात लसनिर्मितीसाठी परवानगी दिली. “कोरोना आणीबाणीत राज्यात लसनिर्मितीसाठी तातडीने हालचाली करून बायोवेट कंपनीला आवश्यक परवानग्या देणे शक्य होते.

परंतु ठाकरे सरकार (Thackeray Government) वर्षभर वसुलीत मश्गूल असल्यामुळे परवानगी लोंबकळली. अखेर हायकोर्टाला लक्ष घालावे लागले. तुमची लस न्यायालयाची जबाबदारी.” असे ट्विट करून भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी या मंजुरीला अकारण उशीर झाला, अशी टीका केली. मांजरी खुर्द येथील कारखान्यात लसनिर्मिती करू देण्यास परवानगी देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकाराला द्या, या मागणीसाठी कर्नाटक येथील ‘बायोवेट’ कंपनी उच्च न्यायालयात गेली होती. ही जागा १९७३ पासून इंटरवेट इंडिया या बहुद्देशीय कंपनी आणि तिची सहकंपनी मर्क अ‍ॅण्ड कंपनीतर्फे वापरली जात होती. हा कारखाना हस्तांतरित करण्याबाबत कंपनीने बायोवेटशी करार केला होता. बायोवेटने या हस्तांतरणासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली. त्यावेळी वन व संवर्धन अधिकाऱ्याने ही जागा वनक्षेत्र म्हणून आरक्षित असून १९७३ मध्येही ती चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केली, असे कारण देऊन जागेच्या हस्तांतरणास नकार दिला. बायोवेटने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले व कोव्हॅक्सिनची निर्मिती करण्याची परवानगी देण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याची मागणी केली.

कारखाना पूर्णपणे कार्यरत असून जागेच्या हस्तांतरणासाठी होत असलेल्या विलंबामुळे तेथील यंत्र सामग्री पडून आहे, असे कंपनीने न्यायालयाला सांगितले. त्यावर कंपनी या जागेवर समान हक्काचा दावा करणार नाही. तसेच कारखान्यात कोव्हॅक्सिनसह जीवरक्षक लसीची निर्मिती केली जाणार असेल तर हस्तांतरणाला आक्षेप नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. न्यायालयानेही कंपनीला याबाबत हमी देण्यास सांगितले होते. कंपनीने हमी दिल्यानंतर न्यायालयाने कंपनीला जागा हस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा केला.


Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button