उस्मानाबाद येथे नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ठाकरे सरकारची मंजुरी

Mantralaya

मुंबई : आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले असून उस्मानाबाद येथे नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ठाकरे सरकारने मंजुरी दिली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

  • जळगाव जिल्ह्यातील हतनूर, शेळगाव, वरणगाव तळवेल या 3 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता
  • धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-2 व 3 अंतर्गत समाविष्ट प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रियेस मान्यता
  • बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्ता वाढ करणे व बालगृह/निरीक्षण गृह, खुले निवारागृह आणि विशेष दत्तक संस्थेतील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
  • महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे व कार्यपध्दतीसाठी मार्गदर्शक सूचना व मॉडेल विधेयकास मान्यता
  • उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे
  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियम 1998 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER