ठाकरे सरकारकडून मोफत लसीकरणाची घोषणा लवकरच; ५.५ हजार कोटी करणार खर्च!

CM Uddhav Thackeray

मुंबई :- कोरोनाला (Corona) हरवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मविआ सरकारकडून लसीकरणाची (Vaccination) तयारी सुरू आहे. मोफत लस दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या लसीकरणावर राज्य सरकारकडून सुमारे ५.५० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मोफत लस देण्याची योजना आखली जात आहे. या मोफत लसीकरण करण्यासाठी दरमहिन्याला दोन कोटी लस विकत घेण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकार लसीकरणासाठी सुमारे ५.५० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ऑगस्टअखेरीस राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट  सरकारने आखले आहे. तसेच, या मोहिमेत सीरमकडे महिन्याला १.५ कोटी कोविशिल्ड लसींची मागणी राज्य सरकारने नोंदवली आहे. त्यांच्याकडून एक कोटी लसी मिळणार आहे. त्याचबरोबर भारत बायोटेककडे महिन्याला एक  कोटी कोवॅक्सीन लसींची मागणी नोंदवली आहे. पण भारत बायोटेककडून ५० ते ६० लाख लसी मिळणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अधिकृतरीत्या घोषणा करतील. दरम्यान, राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मागणी केली होती.

पंतप्रधान मोदींनी ही मागणी मान्य करत पुरवठा वाढवला होता. पण, केंद्राने राज्याला २१ ते ३० एप्रिल दरदिवशी ४० हजार रेमडेसिवीर देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात २६ हजार रेमडेसिवीर उपलब्ध होत आहेत. कंपन्या किती इंजेक्शनचा साठा करत आहे, याबाबतचे पत्र केंद्राला देत आहोत. राज्य सरकार पूर्वी कंपन्यांकडून थेट दिवसा ४० हजारांपेक्षा जास्त रेमडेसिवीर खरेदी करत होते. आता हे अधिकार केंद्राने घेतले आहेत. केंद्र सांगेल तेवढाच पुरवठा आता कंपन्या करत आहेत, अशी माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button