‘ठाकरे’ घराण्यात पहिल्यांदाच सुनबाई राजकारणात, राज ठाकरेंच्या दिमतीला ‘मिताली’पण

Thackeray family daughter-in-law-mitali-thackeray in politics

मुंबई : आगामी मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीसाठी (municipal elections) महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेने कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात आज मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित आहेत. वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये होणाऱ्या या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे उपस्थित आहेतच. मात्र यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अमित ठाकरे यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सून मिताली ठाकरे (Mithali Thackeray) यांनी. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या दिमतीला मिताली यांचीही साथ असेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

अमित आणि मिताली हे दाम्पत्यही मनसेच्या आजच्या बैठकीला उपस्थित आहे. राज्यातील मनसेचे नेते , सरचिटणीस , प्रमुख शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर इथे चर्चा होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभयंकर, गजानन काळे, विविध नेते उपस्थित आहेत.
या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी मनसेकडून विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर ही एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER