मराठी भाषादिनानिमित्त विचारांसह ठाकरे, फडणवीस, पवार, थोरात यांची मनेही जुळली !

Marathi Language Day

मुंबई :- कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी चर्चा झाली. तसेच, मराठी भाषादिनानिमित्त आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दिल्ली हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचं राष्ट्रपतींना निवेदन; राजधर्माचं पालन झाले नसल्याचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. मराठी भाषा गौरवदिनाच्या सोहळ्यानिमित्त मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकमताने, एक विचाराने मुख्यमंत्री ठाकरे, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक असे सर्व नेते आज एकदिलाने एकत्रित जमलेले पाहायला मिळाले.

यावेळी भाषण करताना, ज्या संस्कारातून स्वराज्य उभारलं तीच भाषा मराठी आहे, छत्रपती शिवरायांवर संस्कार घडविणाऱ्या जिजाऊंची भाषा मराठी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. वारकरी संप्रदायाची भूमी असलेल्या मराठी संत ज्ञानेश्वरांपासून ते संत गाडगेबाबांपर्यंत सर्वांनीच मराठीचा प्रचार आणि प्रसार केला. त्याच वारकरी वेशभूषेत विधान भवनात मराठीजन दिसून आले.