ठाकरे ब्रँड? हे नवीन काय काढले ?; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोमणा

महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच 'ब्रँड'

Chandrakant patil & sanjay Raut

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे महात्म्य वाढवण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यात फक्त ‘ठाकरे ब्रँड’ आहे, असे म्हटले आहे. सध्या हा विषय जोरात चर्चेत आहे. यावर राऊतांना टोमणा मारताना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रश्न केला – ठाकरे ब्रँड? हे नवीन काय काढले ? महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही. ते एका वृत्त वाहिनीवर बोलत होते.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांना सोबत येण्याचा संकेत देताना म्हणाले – राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ‘ठाकरे ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत. या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा.

राऊत यांनी राज याना घातलेल्या सादेबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांतदादा म्हणाले – राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेच्या हाकेला प्रतिसाद द्यावा की देऊ नये हे त्यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, मनसेच्या एका नेत्याने याबाबत शिवसेनेला कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER